Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » व्याजदरातील कपात मागे घ्या: भामसंची मागणी

व्याजदरातील कपात मागे घ्या: भामसंची मागणी

BMS-flagनवी दिल्ली, [१९ मार्च] – पीपीएफ आणि किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर मिळणार्‍या उत्पन्नाच्या व्याजदरात कपात करण्याच्या आपल्या निर्णयावर नरेंद्र मोदी सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे अल्पबचत करणार्‍या मध्यमवर्गाची निराशा झाली आहे, याकडे लक्ष वेधत भामसंचे महामंत्री विरजेश उपाध्याय म्हणाले की, यामुळे बँकातील बचतीवरही परिणाम होईल. कमी व्याज मिळणार असेल, तर मध्यमवर्गीय आपला पैसा बँकेत का ठेवेल. मध्यमवर्गाने बँकेत पैसे ठेवणे बंद केले, तर आधीच खराब असलेली बँकांची स्थिती आणखी खराब झाल्याशिवाय राहणार नाही.
सरकारने पीपीएफ, सुकन्या योजना, एनएससी, किसान विकास पत्र, एफडी आणि वरिष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याजदरात कपात केली आहे. या निर्णयाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनधन योजनेलाही बसेल, असे सांगताना उपाध्याय म्हणाले की, सरकारचा हा निर्णय परस्परविरोधी आहे. बाजार आधारित अर्थव्यवस्था आमच्या देशासाठी ठीक नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेत दूरगामी परिवर्तनाची गरज आहे.
बाजार दराच्या बरोबरीत आणण्यासाठी लघुबचतीच्या व्याजदरात कपात करण्यात आल्याचा सरकारचा दावा समर्थनीय नाही, त्यामुळे अल्पबचत करणार्‍या देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना लक्षात घेता सरकारने व्याजदरात कपातीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी उपाध्याय यांनी केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27478

Posted by on Mar 20 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (605 of 2453 articles)


=बंडखोरांनी माफी मागावी= देहराडून, [१९ मार्च] - माझ्याकडे अजूनही बहुमत आहे आणि माझ्या सरकारला कुठलाही धोका नाही. तथापि, मी राज्य ...

×