Home » ठळक बातम्या, विदर्भ » सावरकरांच्या स्वप्नातील राष्ट्रनिर्मिती हवी

सावरकरांच्या स्वप्नातील राष्ट्रनिर्मिती हवी

= रामदेव बाबा =
baba_ramdevनागपूर, (१० फेब्रुवारी) – स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रगुरू असून, गुरुकुलमध्ये शिकत असल्यापासूनचे ते माझे आदर्श आहेत. त्यांच्या स्वप्नातील भारताच्या निर्मितीसाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले.
मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली असता बाबा रामदेव बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना बळकटी देण्याचे काम आपण केले पाहिजे, त्यांचे हिंदुत्व तसेच हिंदू रक्षणाच्या विचारांचा अवलंब आपण प्रत्यक्षात केला पाहिजे. त्यांना दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली असताना देखील ते आपल्या निश्‍चयापासून ढळले नाहीत, याकडे बाबा रामदेव यांनी लक्ष वेधले. सावरकरांच्या अंदमान येथील स्मारकाला आपण लवकरच भेट देणार आहे. मुंबईचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे आपल्यासाठी मंदिरासारखे पवित्र आहे, असेही रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर, रामदेव बाबा यांनी, ‘अखंड भारत करके रहेंगे’चा नारा दिला. यावेळी त्यांच्या समवेत स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह अनुराधा खोत, सहकार्यवाह राजेंद्र वराडकर उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी सावरकर स्मारकाची पाहणी केली. स्मारकाच्या वतीने त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अर्धाकृती पुतळा, नुकत्याच प्रकाशित झालेल्या सावरकरांच्या उर्दू गझल आणि हिंदी गीतांवर आधारित ‘हम ही हमारे वाली हैं’ या सीडीची प्रत, तसेच ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. यानंतर त्यांनी शस्त्रसज्जता आजमाविण्यासाठी स्मारकाच्या मुष्टीयुद्ध केंद्राची तसेच रायफल शूटिंग रेंजची पाहणी केली. यावेळी त्यांनी अचूक नेमबाजी करून उपस्थितांना थक्क केले.
विदेशातील काळा पैसा भारतात परत आणणे, संपूर्णपणे गोवंश बंदी करणे, शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचा योग्य तो मोबदला मिळवून देणे, भाषा संवर्धनासाठी राष्ट्रीय व प्रांतिक भाषेला महत्त्व देऊन नंतर इंग्रजीचा अवलंब करणे, आध्यात्मिक शिक्षणावर भर देणे अशा स्वरूपाचा कार्यक्रम हाती घेऊन आपण भारतभ्रमंती करीत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=10950

Posted by on Feb 11 2014. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (2445 of 2455 articles)


=आजच उरकून घ्या कामे!= मुंबई, (७ फेब्रुवारी) - रविवारची सुटी आणि नंतर दोन दिवस बँक कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप यामुळे तीन ...

×