Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » सोमनाथ भारती यांना अटक

सोमनाथ भारती यांना अटक

=पत्नीचा छळ, हत्येच्या प्रयत्नाचा आरोप=
somnath bharatiनवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ तसेच हत्येचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असलेले आम आदमी पार्टीचे आमदार आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना आज मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावताना, आधी पोलिसांना शरण या, नंतर बोलू, असे स्पष्टपणे बजावले होते. सोबतच त्यांना शरण येण्यासाठी सोमवारी सायंकाळी साडेसहापर्यंतची मुदत दिली होती. पण, सवयीप्रमाणे सोमनाथ भारती मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना शरण आले. काही तासपर्यंत त्यांची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पहाटे त्यांना अटक केली, अशी माहिती पोलिस सहआयुक्त दीपेंद्र पाठक यांनी पत्रकारांना दिली.
भारती यांची पत्नी लीपिकाने द्वारका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), ४२० (फसवणूक), ४०६ (फौजदारी कट) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझे वडील आजारी असल्याने मी सायंकाळी शरण येऊ शकलो नव्हतो. अटक टाळण्याचा किंवा पळ काढण्याचा कुठलाही प्रयत्न मी केला नाही, अशी सारवासारव सोमनाथ भारती यांनी पोलिसांना शरण आल्यानंतर दिली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24124

Posted by on Sep 30 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1389 of 2452 articles)


पिंपरी, [२९ सप्टेंबर] - भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापनातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत भारतीय यांची मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारीपदी (ओएसडी) ...

×