Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » हाफिज सईद, दाऊदला मोक्ष द्या : रामदेव बाबा

हाफिज सईद, दाऊदला मोक्ष द्या : रामदेव बाबा

ramdevbaba1नवी दिल्ली, [६ऑक्टोबर] – भारतीय लष्कराने गुलाम काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक यशस्वीपणे पार पाडल्यानंतर भारतीय जवानांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वच स्थरातून कौतुक करण्यात आले. अनेकांनी या कारवाईवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना योगगुरू रामदेव बाबांनी म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खात्मा करून त्यांना मोक्ष मिळवून द्यावा.
एका मुलाखतीत रामदेव बाबा यांनी अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ विश्‍वासघातकी आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत सुरा खुपसला आहे. त्यामुळे पाकिस्तानबरोबर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. नवाझ शरीफ हे नपुंसक आणि पाकिस्तानी लष्कराच्या हातातील बाहुले बनले आहेत, असेही रामदेव बाबा यावेळी म्हणाले.
चीनबाबत बोलताना ते म्हणाले की त्या देशाने कायम भारताला धोका व पाकिस्तानला साथ दिलेली आहे. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी देशभर गोमांस (बीफ) बंदीसाठी एक विधेयक सादर केले पाहिजे, अशी अपेक्षाही रामदेव बाबांनी यावेळी व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29357

Posted by on Oct 7 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (77 of 2453 articles)


=मॉलेक्युलर मशिन्सचा शोध= स्टॉकहोम, [५ ऑक्टोबर] - रेणुंशी संबंधित असलेल्या मॉलेक्युलर मशिन्सचा (नॅनो मशिन्स) शोध लावल्याबद्दल फ्रान्सचे जीन पीरे सौवेज, ...

×