हिंमत असेल तर तुरुंगात डांबूनच दाखवा!
Monday, September 21st, 2015=स्मृती इराणी यांचे कॉंगे्रसला खुले आव्हान, देशातील महिला कमकुवत नाहीत=
अमेठी, [२० सप्टेंबर] – राजीव गांधी ट्रस्टवर शेतकर्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप केल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावणार्या कॉंगे्रस पक्षाचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज रविवारी खरपूस समाचार घेतला. राहुल गांधी किंवा कॉंग्रेसने मला तुरुंगात डांबूनच दाखवावे, असे थेट आव्हानच स्मृती इराणी यांनी यावेळी दिले.
माझ्या अमेठी दौर्याने काही लोकांना त्रास झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या लोकांनी अमेठीचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला. प्रत्यक्षात कुठलाही विकास झालेला नाही. अमेठीत गांधी घराण्याची लोकप्रियता सातत्याने घटत असल्याने त्यांना त्रास होणे स्वाभाविकच आहे, असे त्यांनी अमेठीच्या गंगवाज गावातील शिवदुलारी महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात रोपट्यांचे वाटप केल्यानंतर उपस्थितांना त्या संबोधित होत्या.
स्मृती इराणी म्हणाल्या की, शनिवारी मी बैठकांमध्ये व्यस्त असताना, माझ्या घरी एक वकील आला. त्याने मला कायदेशीर नोटीस दिली आणि मी जर अमेठीतील सभेत राहुल गांधी, तसेच नेहरू-गांधी घराण्याविरोधात कुठलेही वक्तव्य केले, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली. उत्तरप्रदेश कॉंगे्रसच्या वतीने मला ही नोटीस देण्यात आली. मी जर नेहरू-गांधी घराण्याविरुद्ध बोलणे थांबविले नाही, तर दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे राहणार नाही, असे या नोटीसद्वारे मला बजावण्यात आले आहे. कॉंगे्रस पक्ष किंवा राहुल गांधी यांना जर आजची नारी ‘अबला’ वाटत असेल, तर त्यांनी आपला हा गैरसमज तातडीने दूर करावा. अशा धमक्यांना घाबरणार्यांपैकी मी नाही. अमेठीकरांच्या वतीने मी नेहमीच आवाज उठविणार आहे. मी माझ्या वक्तव्यावर अजूनही ठाम असून, यानंतरही अनेकदा याचा पुनरुच्चार करण्याची तयारी आहे, असे इराणी यांनी यावेळी ठणकावले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=23964

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!