Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » हिवाळी अधिवेशनावर बिहारच्या निकालाचे पडसाद

हिवाळी अधिवेशनावर बिहारच्या निकालाचे पडसाद

sansad bhavanनवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे भवितव्य अवलंबून आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काहीही कामकाज न झाल्यामुळे हिवाळी अधिवेशनातून सरकारला मोठ्या अपेक्षा आहेत.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काहीच कामकाज होऊ शकले नव्हते. लोकसभेत तरी कामकाज झाले, मात्र राज्यसभेत विरोधकांचे बहुमत असल्यामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. लोकसभेत पारित झालेली अनेक विधेयके राज्यसभेत रखडली होती.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले तर राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण बदलणार आहे. रालोआचा विजय झाल्यास आतापर्यंत संसदेत आणि बाहेरही आक्रमक भूमिका घेणार्‍या विरोधकांना विशेषत: कॉंग्रेसला आपल्या भूमिकेत बदल करावा लागणार आहे. आक्रमक भूमिका सोडत मवाळ आणि सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. याचा फायदा भाजपाला आपल्या सरकारची अनेक महत्त्वपूर्ण विधेयके राज्यसभेत पारित करून घेण्यासाठी मिळणार आहे.
मात्र, दुर्दैवाने उलट झाले, बिहारमध्ये महाआघाडीला बहुमत मिळाले तर विरोधी पक्ष विशेषत: कॉंग्रेस पक्ष सभागृहात आणि बाहेरही आणखी आक्रमक भूमिका घेऊ शकतो, सरकारला अडचणीत आणू शकतो. जीएसटीसह अनेक महत्त्वाची विधेयकं रोखून शकतो. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जीएसटीला कॉंग्रेस पक्षाचा विरोध असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सरकारने हिवाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक आणण्याचा प्रयत्न केला, तर कॉंग्रेस त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही, हे स्पष्ट आहे. लोकसभेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे तेथे जीएसटी विधेयक पारित करायला भाजपाला अडचण येणार नाही. मात्र, राज्यसभेत विरोधकांचे बहुमत असल्यामुळे त्याठिकाणी जीएसटी विधेयक पारित होण्यात अडचण येऊ शकते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25251

Posted by on Oct 22 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1303 of 2453 articles)


अब्दुल रशीदकडून अपमान पाकिस्तानी रेडिओवरून केले वक्तव्य नवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] - जम्मू-काश्मिरात गोमांस बंदीवरून वादळ उठले असताना, ‘बीफ ...

×