Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » होय, काश्मिरात आम्हीच पाठविले अतिरेकी

होय, काश्मिरात आम्हीच पाठविले अतिरेकी

  • तोयबाच्या निर्मितीमागे पाक, लादेन आमचा हिरो
  • परवेज मुशर्रफ यांची जाहीर कबुली

musharrafइस्लामाबाद, [२७ ऑक्टोबर] – अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन आणि अल जवाहिरी हे आमचे हिरो होते. त्याचप्रमाणे अमेरिकेविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणारा हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या हक्कानीदेखील आमच्यासाठी हिरोच आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या जम्मू-काश्मिरात प्रशिक्षित दहशतवाद्यांना पाठविण्यातही पाकिस्तानचाच हात आहे, अशी जाहीर आणि तितकीच खळबळजनक कबुली पाकचे माजी हुकूमशाह परवेज मुशर्रफ यांनी आज मंगळवारी दिली.
दुनिया या वृत्तवाहिनीशी बोलताना मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या आणि या देशातील राज्यकर्त्यांचा दहशतवादी चेहराच जगापुढे आणला आहे. लादेनने अमेरिकेवर हवाई हल्ला करून या महासत्तेला मोठा हादरा दिला. त्यामुळे लादेन आणि त्याचा उजवा हात असलेला जवहिरी आमच्यासाठी एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हते. हक्कानी नेटवर्क अजूनही अमेरिकन हिताला नुकसान पोहोचवत असल्याने हक्कानीदेखील आमच्यासाठी हिरोच आहे, असेही मुशर्रफ यांनी या मुलाखतीत सांगितले.
ओघानेच जम्मू-काश्मीरच्या विषयात हात घालताना मुशर्रफ म्हणाले की, हे राज्य भारतापासून मुक्त करण्यासाठी आम्ही आतापर्यंत तीन युद्ध लढलो. पण, त्यात आम्हाला यश आले नाही. त्यामुळे आम्ही भारताविरोधात दहशतवाद्यांच्या माध्यमातून छुपे युद्ध छेडले. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना काश्मिरात पाठविणे, हे सत्रच आम्ही हाती घेतले आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची निर्मिती आम्ही खासकरून भारतविरोधी कारवायांसाठीच केली आहे. कोणत्याही स्थितीत भारताच्या ताब्यातून काश्मीर हिरावून घेणे, हाच आमचा एकमेव उद्देश आहे. यासाठी आम्ही सातत्याने दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत राहणार आहोत, अशी दर्पोक्तीही मुशर्रफ यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25390

Posted by on Oct 29 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1264 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] - उत्सवाच्या काळात राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. प्रदूषणाचे कारण देत ...

×