Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » ११९५ भारतीयांचे २५,४२० कोटी

११९५ भारतीयांचे २५,४२० कोटी

  • एचएसबीसी बँकेतून माहिती फुटली
  • राजकारणी, उद्योगपती, अभिनेत्यांचीही नावे

hsbc swis bankनवी दिल्ली, [९ फेब्रुवारी] – कर बुडव्यांकरिता नंदनवन अशी ओळख असलेल्या स्वित्झर्लंडच्या एचएसबीसी बँकेत सुमारे २०३ देशांमधील एक लाखावर धनाढ्यांच्या खात्यांची माहिती बाहेर आली आहे. यात ११९३ भारतीय खातेदार असून, २००६-०७ या वर्षात या भारतीय खातेदारांच्या खात्यात तब्बल २५,४२० कोटी रुपये जमा असल्याचे उघड झाले आहे.
विदेशी बँकांमध्ये आपला काळा पैसा जमा करणार्‍या सुमारे ६० खातेधारकांची नावे जाहीर करण्याचे केंंद्र सरकारने ठरविले आहे तर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या एसआयटीनेही या पार्श्‍वभूमीवर आपल्या तपासाची व्याप्ती वाढविली आहे. या ११९३ खातेधारकांमध्ये अनेक बडे उद्योगपती, कॉंग्रेस नेते, राजकारण्यांचे नातेवाईक, बॉलीवूडमधील कलावंत, हिर्‍यांचे व्यापारी आणि अनिवासी भारतीयांची नावे असल्याचेही यासंबंधीच्या वृत्तात म्हटले आहे.
एचएसबीसी बँकेतील खातेदारांची यादी फान्सच्या एका वृत्तपत्राला फान्स सरकारमधीलच उच्चस्तरीय सूत्राकडून मिळाली. त्यानंतर ही माहिती वॉशिंग्टनच्या पत्रकारांना मिळाली आणि आता ती देशातील प्रसारमाध्यमांच्या हाती लागली आहे. विदेशातील काळा पैसा प्रकरणी स्विस बँकांमधील भारतीय खातेदारांची एक यादी २०११ मध्ये फ्रान्स सरकारने भारत सरकारला दिली होती. त्यात ६२८ भारतीय खातेदारांची नावे होती. पण, नव्या यादीत ही संख्या दुप्पट झाली आहे. एचएसबीसी बँकेतील ११९३ खातेदार भारतीय असल्याची नवीन माहिती आता समोर आली आहे. सोबतच, या भारतीयांच्या खात्यांमध्ये तब्बल २५,४२० कोटी रुपये जमा असल्याची धक्कादायक माहितीही बाहेर आली आहे. एचएसबीसी बँकेतील एकूण ठेवी सुमारे ६२ लाख कोटी इतक्या रकमेच्या असल्याची माहिती आहे.
पुराव्यानंतरच कारवाई करणार : जेटली
एचएसबीसी बँकेतील खातेधारकांची नावे जाहीर झाली असली, तरी त्यांच्याविरोधात पुरावे असणे गरजेचे आहे. पुराव्यांशिवाय सरकार कोणतीही कारवाई करणार नाही, अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी स्पष्ट केली. यादीत नव्याने नावे आलेल्यांची एसआयटीकडून चौकशी करण्यात येईल, असेही जेटली यांनी सांगितले.
जेटली म्हणाले की, पहिल्या टप्प्यात एचएसबीसीच्या सर्व खातेधारकांची नावे आणि माहिती देण्यात आली आहे. आता सरकार आणि महसूल विभाग ६२८ खात्यांची चौकशी करीत आहे. या खात्यांचे ३१ मार्चपर्यंत मूल्यमापन आणि चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. आम्ही मूल्यमापन सुरू केले आहे. जी खाती बेकायदेशीर आहेत, त्यांच्यावर खटले भरण्यात येतील.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20463

Posted by on Feb 10 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2080 of 2453 articles)


=सरसंघचालकांचे प्रतिपादन= नवी दिल्ली, [९ फेब्रुवारी] - भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि देशातील सर्व हिंदूंना एकत्र आणण्यासाठी सध्याची वेळ ...

×