Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ६ दूरसंचार कंपन्यांचा ४६ हजार कोटींचा घोटाळा

६ दूरसंचार कंपन्यांचा ४६ हजार कोटींचा घोटाळा

=कॅगच्या अहवालात ठपका=
CAGनवी दिल्ली, [९ मार्च] – केंद्रात कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकार सत्तेवर असताना देशातील सहा प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी ४६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा ठपका नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) कार्यालयाने आपल्या ताज्या अहवालात ठेवला आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्स, टाटा, एअरटेल, वोडाफोन आणि एअरसेल यासारख्या कंपन्यांनी त्यांना २००६-०७ आणि २००९-१० या आर्थिक वर्षाच्या काळात मिळालेल्या उत्पन्नाची खोटी आकडेवारी सादर केली असल्याचे कॅगच्या अहवालात नमूद केले आहे.
न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर कॅगने या कंपन्यांच्या जमाखर्चाचे परीक्षण केले. त्यात असे आढळून आले की, या सहा प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी २००६-०७ आणि २००९-१० या आर्थिक वर्षाच्या काळात आपल्या खात्यावर ४६ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कमी दाखविले आहे. याशिवाय, सरकारला देय असलेला १२,४०० कोटी रुपयांचा हिस्साही नाकारला होता, असेही कॅगच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
तत्कालिन संपुआ सरकारने २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात धोरणात्मक चुका लक्षात घेऊन एकूण तोट्याचे अनुमान काढले होते. पण, यावेळी कॅगने सर्व दूरसंचार कंपन्यांच्या जमाखर्चाचे परीक्षण करून प्रत्यक्ष आकडेवारी काढली. २००९ मध्ये दूरसंचार कंपन्यांचा जमाखर्च तपासण्यास कॅगला बंदी घालण्यात आली होती. तथापि, न्यायालयाने २०१४ मध्ये कॅगला पुन्हा परवानगी दिली. त्यानंतर झालेल्या परीक्षणातून हा घोटाळा उघडकीस आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27170

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (716 of 2453 articles)


मुंबई, [९ मार्च] - एकूण १७ बँकांकडून तब्ब्ल ९ हजार कोटींहून अधिक कर्ज घेतलेले किंगफिशरचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती विजय मल्ल्यांनी ...

×