Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ८९७५ स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द

८९७५ स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द

=विदेशी देणग्यांवर अहवाल सादर करण्यात अपयश=
ngoनवी दिल्ली, [२८ एप्रिल] – विदेशातून देणग्या स्वीकारल्यानंतरही त्याबाबतची सविस्तर माहिती देणारा वार्षिक अहवाल सादर करण्यात अपयशी ठरलेल्या देशभरातील एकूण ८९७५ स्वयंसेवी संस्थांचे परवाने केंद्र सरकारने तडकाफडकी रद्द केले आहेत. यात प्रामुख्याने दिल्ली, मुंबई आणि आंध्रप्रदेशातील स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे.
विदेशातून देणग्या स्वीकारणार्‍या १२ हजारावर स्वयंसेवी संस्थांची नोंद केंद्र सरकारकडे आहे. यातील काहीच संस्था नियमितपणे आपल्या देणग्यांची माहिती देणारा वार्षिक अहवाल सरकारकडे सादर करीत असतात. तथापि, बहुतांश संस्था नियमांचे पालन करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने अशा सर्व संस्थांना विदेशी देणग्यांबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी वारंवार लेखी सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर सरकारने तडकाफडकी कारवाई करून अशा एकूण ८९७५ संस्थांचे परवाने रद्द केले आहेत. केंद्र सरकारच्या यादीत वार्षिक अहवाल सादर न करणार्‍या एकूण १०,३४३ संस्थांची नोंद आहे. त्यामुळे उर्वरित संस्थांवरही लवकरच अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ग्रीनपीस संघटनेला विदेशातून मिळणार्‍या मदतीवर निर्बंध घातले होते. त्यानंतर गृहमंत्रालयाने भारतातील १०,३४३ स्वयंसेवी संस्थांना नोटीस पाठवून २००९-१०, २०१०-११ आणि २०११-१२ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे या संस्थांना विदेशातून मिळालेल्या देणगीचा नेमका आकडा समजणार होता. पण, यातील केवळ २२९ संस्थांनीच त्यांचा वार्षिक अहवाल गृहमंत्रालयाला सादर केला. गृहमंत्रालयाच्या नोटिसीला महत्त्व न देणार्‍या उर्वरित ८,९७५ संस्थांचे परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा गृहसचिव सचिव आनंद जोशी यांनी सोमवारी रात्री उशिरा केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22398

Posted by on Apr 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1728 of 2453 articles)


=राज्यपालांची वटहुकुमावर स्वाक्षरी • ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद= मुंबई, [२८ एप्रिल] - सर्वसामान्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावी ...

×