Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक » साडी ! : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक

साडी ! : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : २

MRINAL's DRESSING ARTICLE2मैत्रिणींनो, मागच्या लेखात आपण ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे कपडे वापरु शकतो याची तोंड ओळख करून घेतली. मला त्यापैकी साडीबद्दल थोड अजुन बोलावसं वाटत. आता तुम्ही म्हणाल की यात काय संlगण्यासारख? पण खरंच, साडीबद्दल बोलू तितक थोडं. आपला पारंपरिक पोशाख असलेली साडी सगळ्यात ग्रेसफुल आहे! अंगभर, नीटनेटकी आणि व्यक्तिमत्व प्रसन्न करणारी आहे.
मला एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते. माझी एक ज्युनिअर कलीग एकदा तक्रार सांगत होती, “मॅडम, कितीही सांगितल तरी स्टूडेंट्स ऐकतच नाहीत हो… सीरियसली घेतच नाहीत मला!”.
मी तिच्याकडे पाहिलं… खूप हुशार, पण लहानखुरी, वयाने लहान दिसणारी, नेहमी कॉलेज गोइंग मुलींसारखे कपडे घालणारी माझी ही कलीग! तिची उंची कमी असणं हा तिचा दोष नाही. पण समोरच्याने आपल्याला सीरियसली घ्यावे अशl प्रकारचे कपडे परिधान न करणे हा मात्र दोष होऊ शकतो. मी तिला म्हंटलं, “तुला साडी नेसता येते का? असेल तर आधून-मधून नेसत जा”. तिला माझा सल्ला फारसा पटलेला दिसला नाही. कारण साडी नेसून दिवसभर वावरणं सोपं नाही. तरी तिने सुरूवात केली, आणि काही दिवसांनी मला तिच्या वावरण्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास दिसला आणि इतरांचा तिच्याशी वागण्यात झालेला बदलही! हिच तर खरी गंमत आहे साडीची. साडी आपल्याला ग्रेसफुल बनवते! अर्थात आपण ती नीट-नेटकी आणि छान नेसली असेल तरच!
तुमच्या ऑफिसचा यूनिफॉर्म जर काही ठरवलेला नसेल आणि तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर ऑफिसला जरूर साडी नेसून जा. पण तुमच्या कामाच्या, ऑफिसच्या कल्चरला काय शोभेल याचा अंदाज घेण्यासाठी तुमच्या सीनियर आणि कलीग कशा प्रकारचे कपडे घालतात हे पहाणे ही योग्य!
ऑफिस वेअर म्हणून साडी नेसायला त्याच्या असंख्य व्हरायटी आहेत. फॅशनबद्दल मी काय बोलू? दररोज नवीन डिज़ाइन, पॅटर्न्स आणि ब्रॅण्ड्सच्या जाहिराती आपण पाहतोच. पण त्यातलं आपल्या पर्सनॅलिटीला काय सूट होतं, ते पाहूनच साडी ऑफिस वेअर म्हणून निवडा. तुम्ही पहाल तर बर्‍याच अंशी मोठ्या पदांवर काम करणार्‍या स्त्रिया साडीच ऑफिस वेअर म्हणून पसंत करतात.
१). साडी खूप जणी नेसतात. मग त्यापैकी काहींनाच ती चांगली का दिसते? कारण त्या साडी छान नेसतात आणि छान कॅरी करतात!
२). शक्यतो तुमच्या शरीरयष्टीला सुसंगत होतील असेच फॅब्रिक, डिज़ाइन आणि कलर निवडा.
३). साडी म्हंटलं की ब्लाऊजबद्दलही बोललच पाहिजे. मॅचिंग ब्लाउज् असेल तर साडी जास्त छान दिसते.
४). जास्त खोल गळ्याचे, अतिफॅशनेबल ब्लाऊज शक्यतो ऑफिसमध्ये घालणे टाळावे. आपल्या कपड्यांमुळे आपण कोणाच्या टिंगल टवालीचे कारण बनता कामा नये, याची खबरदारी आपणच घेतली पाहिजे.
५). टाच झाकली जाईल अशा प्रकारे साडी नेसा. संपूर्ण अंग झाकेल अशी साडी नेसली तर व्यक्तिमत्व खरंच भारदस्त दिसते.
६). पदर, निर्‍या, हे व्यवस्थित पिन-अप केल्यास हालचाली सोप्या होतात. त्यामुळे सहज वावरणं सोयीच होतं. या बरोबरच मॅचिंग साडी-पिन्स लावल्या तर अजुन छान दिसते.
७). प्रसंगानुरूप साडीची निवड करा. नेहमी जरी बॉर्डर, जरदोसी, फॅन्सी असे न नेसता ऑफिसच्या कामाच्या स्वरूपानुसार पॅटर्न, डिज़ाइन निवडले तर जास्त छान वाटेल.
८). मिटींग्ज, प्रेज़ेंटेशन्स अशा प्रसंगी तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटेल अशीच साडी नेसा. कारण, अवघडून नेसलेली साडी तुमचा आत्मविश्वास कमी देखील करू शकते.
९). कलर्स हे आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या कॉम्प्लेक्शननुसार आणि प्रसंगानूरूप निवडा.
१०). साडी नुसतीच चांगली नेसू नका, तर ती ग्रेसफुली कॅरी करा! (म्हणजेच तुम्ही साडी नेसून कम्फर्टेबली वावरलात की आपोआप तुमची छाप पडणारच!)
• अजुन एक छोटीशी… पण महत्वाची टिप : तुम्ही साडी नेसून ऑफिसमध्ये जर रिवॉल्विंग किंवा मूविंग चेअरमध्ये बसत असाल, तर साडीचा घोळ त्यात अडकू नये याची पण काळजी घ्या. कारण त्यामुळे, बॉर्डर वर्क असलेल्या साड्या खराब होतात.
• साडीला मॅचिंग असे हलके फुलके एक्सेसरीज् (पर्स, गळ्यातले, कानातले, चप्पलस्/ सॅण्डल्स्, बांगड्या/ ब्रेस्लेट) असे घातल्याने व्यक्तिमत्व अजुन उठावदार दिसू शकते. या बाबतीत स्वतःला अपटूडेट ठेवण्यासाठी टीवी / मासिकं / वर्तमानपत्रामधल्या फॅशन सेगमेंट्सकडे पण लक्ष ठेवायला हरकत नाही.
आजकाल कामाच्या ठिकाणी सेक्शुअल हॅरसमेंट होऊ नये यासाठी स्त्रिया जागरूक झाल्या आहेत. आपल्या वेशभूषेमुळे आपण अशा कोणत्या गोष्टी ओढवून घेत नाही ना…! हे पहाणे ही आपलीच जबाबदारी आहे असे मला वाटते. कामाच्या ठिकाणी औपचारिकता राखण्यासाठी आपली वेशभूषा नक्कीच उपयुक्त ठरते.
आपला उद्देश केवळ छान दिसणे नाही, तर रुबाबदार आणि भारदस्त दिसणे हाही आहे!

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=20482

Posted by on Feb 10 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

2 Comments for “साडी ! : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक”

  1. लेख छान आहे. यापुढील भागामध्ये लेखिकेने western officeware बद्दल काही लिहिले तर वाचायला आवडेल. कारण माझ्या सारखे काही ज्यांना साडी मध्ये वावरणे कठीण वाटते त्यांना western office outfits खूप सोयीचे आणि तितकेच व्यक्तिमत्व खुलवणारे वाटू शकतात.

    • धन्यवाद, मृणालजी या लेख मालिकेत सर्वच प्रकार समाविष्ठ करणार आहेत. ते पुढील लेखात प्रसिद्ध केले जातील.

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (95 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• दिल्लीच्या जनतेकडून भाजपाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. दोन दिवसांतच निकाल जाहीर होतील. केंद्रात भाजपाचे सरकार आहेच. दिल्लीतही ...

×